नोंदणी क्रमांक – महा. राज्य मुंबई १३६१/२०२२जी. बी. बी. एस. डी. दिनांक – १८/८/२०२२
शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत स्थापन झालेली“शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्था” ही भारत स्थित एक -नफा ना- तोटा रजिस्टर संस्था आहे, जी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहे. १५ ऑगस्ट२०२१ रोजी स्थापन झाली आणि १८ ऑगस्ट २०२२ रोजी कायदेशीर रजिस्टर झाली. आमचे ध्येय शिक्षण, वैद्यकीय मदत, रोजगार, कला ,क्रिडा, सामाजिक जागरूकता इत्यादी.कार्यक्रमांद्वारे समाजाला मदत करणे हे आहे. उत्कृष्ट व्यावसायिक आणि कला क्रिडा शैक्षणिक आरोग्य अर्थतज्ज्ञ अशा स्वयंसेवकांचा समावेश असलेली आमची समर्पित टीम एक चांगले भविष्य घडवण्यासाठी अथंक परिश्रम करते. आपल्या समाजाच्या भल्यासाठी आमच्या परिवारात सामील व्हा आणि एकत्र येऊन, भारताचा कायमचा बदल घडवूया!🚩