आमच्याबद्दल

शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्था
"जनसेवा हेच शिवकार्य"

नोंदणी क्रमांक -

क्रमांक महा. राज्य मुंबई १३६१/२०२२
जी. बी. बी. एस. डी. दिनांक - १८/८/२०२२

उद्देश आणि ध्येय

  1. सर्वसामान्य सभासदांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करून त्यांच्यात बंधुभाव, स्नेहभाव व एकोपा निर्माण करणे.
  2. संगणकाचे महत्व विद्यार्थी/विद्यार्थ्यांना पटवून सांगणे त्यासाठी संगणक प्रशिक्षण वर्ग मोफत सुरू करणे व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना मोफत/सवलतीने संगणक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे.
  3. बेरोजगार महिलांना/पुरुषांना रोजगार करीता स्वावलंबी बनविणे.
  4. सर्व सामन्यांच्या मूलभूत गरजा यांना, वस्त्र, निवारा इ. काळजी सातत्याने घेणे, व सक्षमिकरण करण्याबाबत मोहीम व योजना राबविणे.
  5. बालवाडी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा, शाळा, वैद्यकीय अभियांत्रिकी, तांत्रिक महाविद्यालय, व्यावसायिक माध्यमिक शाळा मोफत चालविणे. कनिष्ठ व वरील महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये व बालकाची काळजी घेण्यासाठी पालनगृह मोफत चालविणे. ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर मुलींच्या शिक्षणाची सोय होण्यासाठी १ ली ते १२ वी पर्यंतच्या कन्या शाळा मोफत सुरू करणे.
  6. गोर गरीब गरजूंना वैद्यकीय मदत करणे, रुग्णांना रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करणे त्यासाठी धर्मार्थ दवाखाने स्थानपण करणे व कॅन्सर, एड्स, टी. बी. रोगाबाबत वैद्यकीय शिबिरे तसेच नेत्रज्ञान, रक्तदान शिबिरे आयोजित करून त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य मदत करणे व त्याबाबत मार्गदर्शन करून त्यांची समस्या सोडविणे.
  7. व्यावसायिक शिक्षणासाठी पशू वैधयकीय व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन, मत्स्य शेती, लोकर विकास, रोप वाटिका उपक्रमाचे मोफत मार्गदर्शन करणे.
  8. अभ्यासिका तसेच वासतिगृहतील विद्यार्थी, विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना गणवेश व शैक्षणिक साहित्य मोफत पुरविणे व त्यांना मूलभूत सुविधा प्राप्त करून देणे.
  9. व्यावसायिक मार्गदर्शन व व्यावसायिक विकास कार्यक्रमाचे आयोजन करणे.
  10. आंतरजातीय विवाहित जोडप्यांना पूरक अर्थसाहाय्य, विवाह इच्छुक मेळावा, सामूहिक विवाहाचे आयोजन करणे.
  11. गरीब रुग्णांना मदत करणे, आशा लोकांवर जेव्हा वैद्यकीय औषधांसाठी आणि मोठ्या शस्त्रक्रियेसाठी मदत करणे, रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून मोफत करून देणे. वैद्यकीय शिबिरे, रक्तदान शिबिरे आरोग्य केंद्र मोफत आयोजित करणे व गोरगरिबांसाठी धर्मीय दवाखाना मोफत स्थापन करणे.
  12. व्यसन सोडण्यासाठी तसेच दारूबंदी, अमली पदार्थ, एड्स, कुष्टरोग, या समस्यांवर प्रचार करणे प्रसार कार्य करणे.
  13. नाट्य स्पर्धा, सोशल, राष्ट्रीय एकात्मता, कालापथक, पथनाट्य बसविणे व आयोजित करून सांस्कृतिक एकात्मता टिकविणे.
  14. पुनर्वसन – अपंग, मुकबाधिर, मतीबंद, अंध, अनाथ, देवदासी, वेश्या, एड्सग्रस्त, कॅन्सरग्रस्त, कुष्टरोग पुनर्वसन लोकांना मोफत मदत करणे.
  15. महिलांसाठी – पुरुषांसाठी वृद्धाश्रम, महिलाश्रम, महिला सुधारगृह मोफत स्थापन करणे.
  16. हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, मार्गदर्शन करणे, बक्षिसे देणे, त्यांच्या यथोचित सत्कार करणे त्यांना आवश्यक मोफत मदत करणे.
  17. सर्व प्रकारचे व इत्यादि सार्वजनिक व राष्ट्रीय सण साजरे करणे, थोर पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथि साजरी करणे.
  18. दुष्काळग्रस्थासाठी टॅकर द्वारे पाणीपुरवठ्याची सोय व बोरिंग व पाईपलाइन उपलब्ध करून देणे.
  19. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता विषयक मोहीम राबविणे, शासनाचे स्वच्छतेविषयक उपक्रम राबविणे, स्वच्छ भारत अभियान राबविणे.
  20. गरजू व योग्य लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे.
  21. माता बाळसंगोपन, सकस आहार, कुटुंब कल्याण बाबतच्या योजनेसाठी मार्गदर्शन करणे.
  22. शासनाच्या विविध महिला बाल कल्याणच्या योजनेची माहिती मिळवून देण्याचा प्रयत्न करणे.
  23. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे व अनाथ निराधार
    व गरीब परिस्थितील गरजू महिलांच्या विकासासाठी व उन्नतीसाठी प्रयत्न करणे.

पदाधिकारी

नितीन महादेव औटे

संस्थापक

दिपाली नितीन औटे

सेक्रेटरी

संजय पांडुरंग धामणसे

खजिनदार
Scroll to Top